पृथ्वी २६०० पर्यंत होईल आगीचा गोळा, भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

पृथ्वी २६०० पर्यंत होईल आगीचा गोळा, भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

पृथ्वीची वाढतील लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेला ऊर्जेचा वापर यामुळे २६०० पर्यंत पृथ्वी हा एक आगीचा गोळा होईल, अशी भीती प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली आहे. लोकांचे अस्तित्व टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते. स्टीफन हॉकिंग म्हणाले, ‘जगाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फटका मानवजातीला बसणार आहे.’ बदलणारे तापमान, त्याचे वातावरणावर होणारे परिणाम याबाबत गंभीर विचार करण्याची गरज असून, सर्वांनी एकत्रितपणे विचार केल्यासच याचा सामना करता येईल, असे हॉकिंग यांनी म्हटले आहे. माणसाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर वस्ती करण्यायोग्य ग्रहाचा ग्रहाचा शोध घ्यावाच लागेल, असे हॉकिंग यापूर्वी म्हणाले होते.