महिलांना दारूची विक्री करण्यावरील प्रतिबंध श्रीलंकेने हटविले

महिलांना दारूची विक्री करण्यावरील प्रतिबंध श्रीलंकेने हटविले

कोलंबो - श्रीलंकेच्या मास मीडिया व वित्त मंत्रालयाने महिलांना दारूची विक्री करण्यावरील प्रतिबंध हटविला आहे. दारूची निर्मिती किंवा विक्री केली जाते, अशा ठिकाणी स्त्रियांना कामावर ठेवण्यास बंदी होती. ती बंदीसुद्धा हटवण्यात आली आहे.

१९५० च्या श्रीलंकन कायद्यानुसार, कोणतेही मद्य स्त्रियांना विकले जाऊ शकत नव्हते. तसेच त्यांना कोणत्याही मद्य उत्पादन आऊटलेट्स किंवा रिटेल स्टोअरमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. वित्तमंत्री मंगला समरावीरा यांनी ही घोषणा केली.

नवीन कायद्यानुसार महिलांना यापुढे मद्य उत्पादन आऊटलेट्स किंवा मद्य पिण्यासाठी 'एक्साईझ कमिशनर'ची परवानगी लागणार नाही.