पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांची हिंदू कायदा बिल २०१७ वर स्वाक्षरी

पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांची हिंदू कायदा बिल २०१७ वर स्वाक्षरी

कराची: पाकिस्तानातील हिंदूंसाठी आनंदची घटना आज घडली आहे. बहुप्रतिक्षित हिंदू विवाह बिल-२०१ वर राष्ट्रपती ममनून हुसैन यांची स्वाक्षरी झाली असून, आता पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंसाठी विवाहाचा स्वतंत्र कायदा अस्तित्वात असेल. विशेष म्हणजे, या कायद्यामुळे येथील हिंदू समाज आता आपल्या परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न करु शकणार आहेत. तसेच हिंदू तरुण-तरुणींच्या लग्नामध्ये येणारे अडथळे या कायद्यांमुळे दूर होणार आहेत.

कायद्याच्या मंजूरीचे फायदे

  • या कायद्यामुळे हिंदूंना लग्नाचा अधिकार प्राप्त असेल.
  • याशिवाय लग्नानंतर पती-पत्नी कायदेशीररित्या विभक्त झाल्यास, त्यांच्या आपत्यांसाठी आर्थिक मदतीची विशेष सोय असेल.
  • लग्न झालेल्या व्यक्तीला लग्न करण्यासाठी आणि विधवा विवाहासाठीही या कायद्यात वेगळी तरतूद केली आहे.
  • या कायद्याने पूर्वीच्या हिंदू लग्नांना कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच जुने वाद सोडवण्यासाठी कौटुंबिक कोर्टात ते चालवले जातील.
  • या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस कडक शिक्षेची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये एक लाखांचा दंड आणि तुरुंगवास आदी शिक्षांची तरतूद आहे.

सिंध प्रांतात हिंदूंच्या लग्नासाठी स्वतंत्र कायदा लागू असल्याने हा कायदा तिथं लागू करण्यात येणार नाही.