ओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प

ओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.  'बराक ओबामा अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली होती. ओबामांनी माझे फोन टॅप केले होते 'असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. 

ओबामा यांच्याविरोधात न्यायालयात एक निष्णात वकील सशक्त खटला सादर करू शकेल इतकी तथ्ये आपल्याकडे आहेत असे ते म्हणाले. निवडणुकीसारख्या पवित्र काळात माझे फोन टॅप करण्याइतकी बराक ओबामांची पातळी घसरली असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.