रेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले !

रेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले !

टेक्सास: अमेरिकेतील टेक्सास येथील नेवासोटा स्थानकात एक १९ वर्षीय महिला स्वतःचे फोटो काढत असताना तिला एका ट्रेनने उडवल्याची घटना घडली आहे. फ्रेझोनिया थॉम्पसन असे ह्या मॉडेलचे नाव असून ती १९ वर्षाची होती.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी फ्रेझानिया गरोदर होती. एका ट्रेनमधून उतरुन ती रेल्वे ट्रॅकवर फोटो काढत होती. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनने तिला उडवलं.रेल्वे ट्रॅकवरील तिचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ज्या ट्रेनने फ्रेझानियाला उडवलं, त्या ट्रेनची कंपनी, युनियन पॅसिफिकचे प्रवक्ते जेफ डी ग्राफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट सुरु असल्याचं आम्ही पाहिलं नाही. मात्र ट्रेन जवळ आल्यावर चालकांच्या टीमने फोटोग्राफर आणि इतरांना ट्रॅकवर पाहिलं. त्यांना अलर्ट करण्यात आलं. तसंच ट्रेन थांबवण्याचाही प्रयत्न केला.”