आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर काळाच्या पडद्याआड

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर काळाच्या पडद्याआड

लाहोर - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर यांचे लाहोर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. पाकिस्तानी माध्यमांनी जहांगीर यांच्या निधनाचे वृत्त दिले. जहांगीर यांना अस्वस्थ वाटत असल्याने फिरोजपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

 

लष्करी सत्तेला आव्हान देणारी रणरागिणी :
अस्मा जहांगीर या लाहोरस्थित सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलच्या प्रमुख होत्या. तसेच पाकिस्तान मानव अधिकार आयोगाच्या प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. असमा जहांगीर या जनरल झिया उल हक यांच्या लष्करी सत्तेला आव्हान दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. जहांगीर यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानव अधिकार आयोगवर देखील काही काळ काम पाहिले.