भारताची ड्रोनच्या माध्यमातून घूसखोरी, चीनचा आरोप

भारताची ड्रोनच्या माध्यमातून घूसखोरी, चीनचा आरोप

बीजिंग - भारत आणि चीनमधील वाद काही कमी होत नाही. आता भारतीय ड्रोन चीनच्या एअर स्पेसमध्ये घुसल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी ११ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी चीनने केलेल्या आरोपामुळे चर्चांना उधाण आले आहे.चीनच्या वेस्टर्न जॉयंट कमांड स्टाफ डिपार्टमेन्टचे झांग शुइली यांनी भारतीय ड्रोनने चीनच्या एअर स्पेसमध्ये घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. चीन सीमेवर तैनात चीनी सैन्याने या प्रकरणी पुष्टी केली असल्याचेही त्यांनी म्हटले. भारत अशा प्रकारे चीनच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असेल तर चीनच्या संरक्षणासाठी आम्ही ठोस कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.डोकलाम विवादापासून भारत-चीन संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. गेल्या महिन्यात बीजिंगमध्ये भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये सीमा सुरक्षेसंबंधी बैठक पार पडली होती. यावेळी द्विपक्षीय संबंधाच्या सुधारणेसाठी दोन्ही देशांच्या सैन्याला सीमेवर शांतता राखण्यास सांगितले होते.