इगतपुरीत मनःशांतीसाठी दाखल झाले अरविंद केजरीवाल

इगतपुरीत मनःशांतीसाठी दाखल झाले अरविंद केजरीवाल

नाशिक : नाशिक येथील जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी शहरातील विपश्यना विश्व विद्यापीठात सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनःशांतीसाठी दाखल झाले आहे. आजपासून सुरु झालेल्या १० दिवसीय शिबिरात साह्भागी होत साधना करणार आहेत. राजकीय संकटाबरोबरच मागील काही दिवसापासून प्राकृति अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारांसाठी दक्षिणात्य राज्यांमध्ये जावे लागले होते. या सर्व पार्श्व भूमीवर प्रशासनात असतांना योग्य निर्णय घेण्यासाठी मनःशांतीसाठी त्यांनी इगतपुरीत येऊन विपश्यना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत इगतपुरीत पहाटे चार वाजेच्या सुमारास आले. ध्म्मगीरीच्या वतीने व्यवस्थापक सावालाजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, नागार्सेवक नईम खान, सुनील रोकडे उपस्थित होते.