एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी हिने केल्यात ५० सर्जरी

एंजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी हिने केल्यात ५० सर्जरी

एंजेलिना जोलीचे जगभर लाखो फॅन्स आहेत हे आपण जाणतो. पण तिची सर्वात मोठी फॅन आहे इराणमधील सहर ताबर. एंजेलिनासारखे तिला दिसायचे आहे. यासाठी ती प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. यासाठी तिने आपल्या चेहऱ्यावर सर्जरी करायचे ठरवले. आजपर्यंत तिने तब्बल ५० वेळी सर्जरी करुन घेतली आहे. एंजेलिना जोलीची आपण सर्वात मोठी फॅन असल्याचा सहरचा दावा आहे. एंजेलिनासारखे दिसण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो असे ती म्हणते. सर्जरी करण्यासाठी आवश्यक डायट तर तिने पाळलाच पण आपले वजन ४० किलोहून अधिक होऊ नये यासाठी तिने काळजीही घेतली. आपल्या चेहऱ्यात झालेल्या बदलाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या प्रयत्नाचे काहीजण कौतुक करीत असले तरी काहीजणांनी तिला ट्रोलही केले आहे. तिचा या फोटोंना काही युर्सनी 'झोंबी' असल्याचेही चेष्टेत म्हटले आहे. या ट्रोलिंगचा सहरवर काहीही परिणाम झालेला नाही. एंजेलिनासारखे दिसण्यासाठी काहीही करायचा ध्यास तिने मनी बाळगलाय. ती अजून काय काय करते हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.