पिंपल्स टाळायचे आहेत हे करू नका!

पिंपल्स टाळायचे आहेत हे करू नका!

मुंबई: पिंपल्स हि सर्वांचीच एक गंभीर समस्या झाली आहे. चेहरा स्वच्छ न धुतल्याने किंवा तेल, दूध, तूप हे अधिक प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. खालील कारणांमुळे पिंपल्स होऊ शकतात तेव्हा शक्यतो हे करणे टाळा.

  • चेहरा स्वच्छ न धुतल्याने पिंपल्स होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दिवसातून किमान दोनवेळा चेहरा पाण्याने स्वच्छ धुण्याची गरज आहे.
  • जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खात असाल, तर पिंपल्सची शक्यता असते. दुधात आयजीएफ-1 (इन्सुलिन-ग्रोथ फॅक्टर-1) असतं, जे पोटात गेल्याने त्रास होतो. तेलकट पदार्थ खाल्ल्याने अंगावरील रोम छिद्र बंद होऊ शकतो, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्सची शक्यता वाढते.
  • स्मार्टफोन अधिक वेळ कानाशी लावून बोलत राहिल्यानेही आरोग्याला त्रास होऊ शकतो. बॅक्टेरिया त्वचेच्या रोम छिद्रातून शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळेही पिंपल्सची समस्या उद्भवते. त्यामुळे फोनवर बोलताना ईयर फोनचा वापर करा.
  • शरीरावर बॉडी लोशन लावल्यानेही पिंपल्स होऊ शकतात.
  • जास्त गोड खाणंही पिंपल्सला निमंत्रण देऊ शकतं. साखरेत ग्लायसेमिकचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात खाणं टाळावं.