‘माझ्या मुलाला रिअॅलिटी शोमध्ये पाठवणार नाही’

‘माझ्या मुलाला रिअॅलिटी शोमध्ये पाठवणार नाही’

पुणे : रिअॅलिटी शोचं परीक्षण करणाऱ्यांना मात्र आपली मुलं या व्यासपीठावर नको, असं वाटतं. अभिनेत्री शिल्पा शेट्टीही त्यापैकीच एक. हे व्यासपीठ ज्यांना कधीच संधी मिळालेली नाही अशांसाठी आहे, माझ्या मुलाला आत्ताच खूप प्रसिद्धी मिळाली आहे, असं ती म्हणते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठ्या पडद्यावर काम करून बरीच वर्षं झाली. सध्या ती टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमांत रमलेली आहे. टीव्हीवर ती लवकरच लहान मुलांवर आधारित एका डान्स रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. गुणवान लहान मुलांसाठी रिअॅलिटी शोचं व्यासपीठ उत्तम आहे असं सांगतानाच, ती आपल्या मुलानं रिअॅलिटी शोमध्ये जावं, असं वाटत नसल्याचं ती म्हणते. परत मोठ्या पडद्यावर येण्याची इच्छा होत नाही, का असं विचारल्यावर शिल्पा म्हणाली, ‘मी जे करतेय, त्यात खूप खूश आहे, कारण त्यातून मला बराच वेळ मिळतो, जो माझा मुलगा आणि कुटुंबाबरोबर घालवता येतो. हां, चाहत्यांच्या प्रेमाची खूप आठवण येते. किंबहुना एखाद्या कलाकारानं अभिनय सोडल्यानंतर त्याला सगळ्यात जास्त आठवण येते, ती प्रेक्षकांच्या प्रेमाचीच. पण ते मला टीव्हीद्वारेही मिळतंय. माझं यु-ट्यूब चॅनेल आहे, शिवाय इन्स्टाग्रामवरही मी सक्रिय आहे.’