या उन्हाळ्यात कोकण भ्रमंती होईल अधिक आरामदायक ; कोकण रेल्वेतर्फे विशेष गाड्या

या उन्हाळ्यात कोकण भ्रमंती होईल अधिक आरामदायक ; कोकण रेल्वेतर्फे विशेष गाड्या

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-करमाळी, एलटीटी-मंगळुरु, सीएसएमटी-कोचुवलीसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी बाहेरगावी निघालेल्या प्रवाशांना आणि पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

०११९३ एलटीटी-करमाळी साप्ताहिक गाडी ७ एप्रिल ते ९ जूनपर्यंत दर शनिवारी रात्री १.१० वाजता सुटून दुपारी ११.२० वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ०११९४ ही करमाळी-एलटीटी साप्ताहिक सुपरफास्ट गाडी ७ एप्रिल ते ९ जूनपर्यंत दर शनिवारी करमाळीहून दुपारी १.४० वाजता सुटून रात्री ११.३५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीला कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे असे थांबे दिले आहेत. ०११९५ एलटीटी-मंगळुरू जंक्शन गाडी ८ एप्रिल ते १० जूनपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री १.१० वाजता सुटून मंगळुरू येथे त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता पोहोचेल. तर ०११९६ ही मंगळुरूहून ८ एप्रिल ते १० जूनपर्यंत दर रविवारी ९.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी एलटीटीस दुपारी ३.३० पर्यंत पोहोचेल. या गाडीस ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, मुकाम्बिका, बिंदूर, कुंदापुरा, उडिपी, मुलकी, सूरतकल हे थांबे दिले आहेत. 

याशिवाय ०१०७९ सीएसएटी-कोचुवेली- साप्ताहिक गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी मंगळवार १० एप्रिलपासून प्रत्येक सोमवारी सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटून बधुवारी सकाळी ९.४५ वाजता कोचुवली येथे पोहोचेल. परतीच्या मार्गावर ०१०८० ही गाडी कोचुवलीहून दर बुधवारी दुपारी १२.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या सर्व स्पेशल गाड्यांना २० कोच असणार आहेत.