हनीमूनसाठी ही ठिकाणे पसंत करतात कपल्स

हनीमूनसाठी ही ठिकाणे पसंत करतात कपल्स

लग्नाच्या हंगामानंतर बहुतांश जोडपी हनीमूनसाठी समुद्र किनाऱ्यावरील ठिकाणांच्या शोधात असतात, एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी मेक माय ट्रिपने २५ वर्षापासून ३४ वर्षापर्यंतच्या वयातील ५०० लोकांचे सर्वेक्षण केले. यापैकी ४९ टक्के लोकांनी हनीमूनसाठी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या स्थळांना पहिली पसंती दिली. २३ टक्के लोकांनी प्रसिद्ध शहरांना हनीमूनसाठी निवडले.

सर्वेक्षणानुसार ६० टक्के लोकांनी सांगितले, की ते मूळ स्वरूपात दर्शनीय असलेल्या ठिकाणी जाणे पसंत करतील. ७४ टक्के लोकांनी फिरताना दोनपेक्षा अधिक शहरांमध्ये फिरायला जाणे आवडणार नसल्याचे सांगितले.  लग्नाच्या घाई-गडबडीनंतर शांततेत वेळ घालवण्यासाठी लोक हॉटेल व रेसॉर्टमध्ये थांबणे पसंत करतात. यापैकी ४० टक्के लोकांनी पंचतारांकित व २९ टक्के लोकांनी चार तारे असणाऱ्या हॉटेलमध्ये राहायला पसंती दिली. 

सर्व्हेनुसार, ४९ टक्के लोकांना कँडल लाईट प्रकाशात व समुद्र किनाऱ्यावर डिनर करणे आवडत असल्याचे सांगितले. याशिवाय ४४ टक्के जोडप्यांना स्पा करणेही आवडत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.