सनी लिओनीच्या पार्टीवर कर्नाटक रक्षणा वेदिके युवा सेनेची ‘वक्रदृष्टी

सनी लिओनीच्या पार्टीवर कर्नाटक रक्षणा वेदिके युवा सेनेची ‘वक्रदृष्टी

बंगळुरू - अभिनेत्री सनी लिओनीची बंगळुरू येथे होणाऱ्या 'न्यु इअर पार्टी'ला आता विघ्न येऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांनी सनी लिओनीच्या पार्टीवर आक्षेप घेत ही पार्टी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे 'न्यु इयर पार्टी' वादात सापडली आहे. शहरातील ऑर्चीड येथील आटी पार्कमध्ये ३१ डिसेंबर रोजी सनी लिओनीच्या पार्टीचे आयोजन करण्याचा बेत आहे. मात्र, या पार्टीवर कर्नाटका रक्षणा वेदिके युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. कार्यकर्त्यांनी मान्यता आटी पार्कबाहेर शुक्रवारी निदर्शने केली. पार्टीचे आयोजन केले तर सामूहिक आत्महत्या करणार, असा इशारा कार्यकर्तांनी दिला. याची दखल कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी घेतली आहे.

लिओनीच्या पार्टीला परवानगी द्यायची की नाही, याबाबत पोलीस निर्णय घेतील, असे रेड्डींनी स्पष्ट केले आहे. या पार्टीच्या तिकीटाची विक्री केली जात असून, सुमारे तीन ते आठ हजार रुपयापर्यंत तिकीटांची किंमत आहे.