विमानात हवाई सुंदरीचे शूटींग करणा-या एकाला अटक

विमानात हवाई सुंदरीचे शूटींग करणा-या एकाला अटक

मुंबई, दि. २२ - इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील केबिन क्रू शी गैरवर्तन केल्या प्रकरणी तीन प्रवाशांना गुरुवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानातील हवाई सुंदरीचे मोबाईलवर शूटिंग केल्या प्रकरणी या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली. कोलकात्याहून मुंबईला येणा-या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात गुरुवारी ही घटना घडली.
 
विमानातील हवाई सुंदरीचे शूटींग करण्यासाठी या तिघांनी आपल्याजवळच्या मोबाईलचा वापर केला असे इंडिगोमधल्या सूत्रांनी सांगितले. पण पोलिसांनी एकजण दोषी असल्याचे सांगितले. व्हिडीओ शूटींगचा प्रयत्न सुरु असताना विमानातील एका प्रवाशाने क्रू ला सर्तक केले. इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने ही घटना घडल्याला दुजोरा दिला आहे.
 
कोलकाताहून मुंबईला येणारे इंडिगोचे विमान हवेत असताना काही प्रवाशांनी मोबाईलवर हवाई सुंदरीचे चित्रीकरण सुरु केले. एका प्रवाशानेच केबिन क्रू ला याची माहिती दिली. विमानाच्या कॅप्टनच्या कानावर ही घटना घालण्यात आली. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा कर्मचा-यांनी तिघा प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. चित्रीकरण करणारे तिघेही बांगलादेशमधून रस्ते मार्गाने कोलकाताला आले होते असे सूत्रां