नाशिक प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने पर्यटनासाठी ब्रँडिंग करणे आवश्यक : रावल

नाशिक प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने पर्यटनासाठी ब्रँडिंग करणे आवश्यक : रावल

नाशिक : नाशिकच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रातील वैशिष्ट्य जाणून पर्यटनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करावे,असे आव्हाहन राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

रावल पुढे म्हणाले, पर्यटन हा चोवीस तस आणि वर्षभर सुरु राहणारा व्यवसाय आहे. पर्यटनाच्या माध्यमातून कौशल्य विकासाबरोबरच रोजगार निर्मिती होत असते. त्यामुळे पर्यटनक्षेत्राला चालना देण्याचे काम पर्यटन विकास महामंडळाकडून करण्यात येते आहे.

नाशिक ट्रॅव्हल मार्ट अंतर्गत प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, एमटीडीसीचे सह व्यवस्थापक संचालक आशुतोष राठोड, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, ‘तान’ चे अध्यक्ष दत्ता भालेराव, लक्षमण सावजी, यांच्यासह विविध ट्रॅव्हल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.रावल यांनी पर्यटकांच्या वाहतूक सुविधेबाबत विविध पर्यायांसंदर्भात विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, तसेच ‘तान’मार्फत लावण्यात आलेल्या विविध ट्रॅव्हल कंपन्यांच्या प्रदर्शनाला श्री.रावल यांनी भेट दिली.