धूर येऊ लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिग

धूर येऊ लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिग

मुंबई, दि. २८ - एअर इंडियाच्या हैदराबादहून मुंबईला येणा-या विमानाचे मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. विमानाच्या सामान कक्षातून धूर येऊ लागल्याने सकाळी ८.३० च्या सुमारास फ्लाईट ६२०चे इमर्जन्सी लँडिग करावे लागले.
दरम्यान विमानातील सर्व १२० प्रवाशांना आप्तकालीन मार्गाने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने कोणलाही दुखापत झालेली नाही. दरम्यान विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली असून पर्यायी धावपट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे.