एअर इंडियाच्या विमानाचा संपर्क तुटला

एअर इंडियाच्या विमानाचा संपर्क तुटला

अहमदाबादहून लंडनला गेलेल्या एअर इंडिया एआय १७१ विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानामध्ये एकूण २३१ प्रवासी आणि १८ कर्मचारी होते. या प्रवाशांच्या सुटकेसाठी तातडीने फायटर जेट्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर विमानाने लंडन येथील हीथ्रो विमानतळावर लॅंडिंग केले. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी माध्यमाना सांगितले.

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या एआय १७१ या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. त्यामुळे खळबळ उडाली होती. हंगेरी या देशाच्या एअरस्पेसमध्ये असताना हा संपर्क तुटला होता. संभाव्य धोका टाळण्यासाठी तत्परतेने फायटर जेट्स पाठवण्यात आले होते. काही वेळानंतर लंडनच्या हीथ्रो विमानतळावर या विमानाचे लॅंडिंग करण्यात आले होते.  फ्रिक्वेंसी फ्लक्चुएशनमुळे हा संपर्क तुटला होता असे प्रवक्त्यांनी सांगितले. अंदाजे ४५ मिनिटे ते १ तास संपर्क तुटल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी वैमानिकांची चौकशी करण्यात येणार आहे असे अधिकाऱ्यांनी म्हटले.