व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार.

व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार.

लोकप्रिय  इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप त्याचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणणार आहे. व्हॉट्सअॅप या फीचरची टेस्टिंग करत असून व्हॉट्सअॅप बीटा टेस्टर हे फीचर About नावानेही वापरु शकतात. अँड्रॉईडच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस ऑप्शन दिसत आहे. खरंतर व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या नव्या ‘स्टेटस’ फीचरबाबत अनेक युझर्स टीका करत आहेत. 

इन्स्टाग्रामच्या‘स्टोरी’सारखं स्टेटस फीचर बहुतेक युझर्सना आवडलं नाही. तुम्ही तुमचे  व्हॉट्सअॅप पूर्वीप्रमाणे वापरू शकता. आधीप्रमाणेच यावेळीही तुम्हाला काही डिफॉल्ट स्टेट्स ऑप्शन दिसतील जे पूर्वी स्टेट्स मध्ये दिसायचे. गंमत म्हणजे जुन्या टेक्स्ट स्टेटससोबत नवं स्टेटस फीचरही कायम राहिल. फक्त नव्या फीचरचं नाव About असेल. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार दोन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडता येणार आहे.