व्हॉट्सअॅपने दिली युजर्सना नवी भेट

व्हॉट्सअॅपने दिली युजर्सना नवी भेट

मुंबई: काल जितक्या व्हॉट्सअॅप युजर्सनी सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअॅप सुरु केले तेवढ्या सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. कारण व्हॉट्सअॅपने त्यांचे नवे स्टेटस फिचर लौंच केले आहे. ह्या फिचरमुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन गोष्टी फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करू शकता

.आतापर्यंत युजर्स त्यांचे स्टेट्स फक्त शब्दांमध्ये व्यक्त करू शकत होते पण आता ह्या नव्या फिचरमुळे तुम्ही व्हिडीओ, फोटो आणि जीआयएफ यांसारखे विविध पर्याय वापरू शकाल. व्हॉट्सअॅपचे सीईओ जैन काॅनने आपल्या ब्लॉगमध्ये घोषणा केली व्हॉट्सअॅपच्या ८व्या बर्थडेला व्हॉट्सअॅप स्टेट्स हे नवीन फिचर लाँच करणार आहे. आता इनस्टाग्राम, स्नॅपचॅट ह्यांसारख्या इतर अॅप्लीकेशनप्रमाणेहि आपण व्हॉट्सअॅपचा वापर करू शकतो.