बॉक्स ऑफिसच नव्हे, ‘सर्च बॉक्स’मध्येही सनी लिऑन अव्वल

बॉक्स ऑफिसच नव्हे, ‘सर्च बॉक्स’मध्येही सनी लिऑन अव्वल

मुंबई :  बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिऑनचा ‘तेरा इंतजार’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर भलेही कमी कमाई करत असेल, मात्र सर्च बॉक्सवर सनी लिऑनचाच जलवा दिसून येतोय. याहू इंडियाच्या टॉप-10 मोस्ट सर्च फिमेल सेलिब्रिटीजमध्ये सनी लिऑन पहिल्या स्थानावर आहे.विशेष म्हणजे, सनी लिऑनने टॉप-10 मोस्ट सर्च फिमेल सेलिब्रिटीजच्या यादीत ऐश्वर्या रॉय, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, करिना कपूर यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. खरंतर यंदा सनी लिऑनचा एकही बिग बजेट म्हणावा असा किंवा मोठ्या सुपरस्टारसोबतचा सिनेमाही प्रदर्शित झालेला नाही, तरीही सनी लिऑनने सर्च बॉक्समधील आपलं स्थान कायम ठेवलं आहे. सनी लिऑनने यंदा निशा नामक मुलीला दत्तक घेतलं. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. अर्थात, चर्चा होणं हे काही सनीसाठी नवीन नाही. मात्र मुलगी दत्तक घेतल्याने सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्या दरम्यान सनी लिऑन जास्त सर्च झाल्याचे दिसून येते. खरंतर सनी लिऑन वर्षाच्या बाराही महिने सर्च बॉक्समध्ये असतेच.