परग्रहावरील जीवांशी संवाद साधण्यासाठी ‘नासा’ करणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

परग्रहावरील जीवांशी संवाद साधण्यासाठी ‘नासा’ करणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

वॉशिंग्टन - 'स्पेस कम्युनिकेशन' तंत्रात सुलभता आणण्याकरता 'नासा' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहे. मानवी हस्तक्षेप विरहित तंत्राचा अवलंब करुन 'स्पेस कम्युनिकेशन' मध्ये सुलभता आणि गतिमानता वाढविण्याकरता या पर्यायाचा अवलंब केला जाणार आहे. आजच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांत केला जातो. सध्या आधुनिक 'स्पेस कम्युनिकेशन' तंत्रात विविध सॉफ्टवेअर वापरली जातात. मात्र, त्यांच्या वापरात जटिलता असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यावर पर्याय म्हणून 'कॉग्निटिव रेडिओ' सारख्या मानवी हस्तक्षेप विरहित तंत्राचा अवलंब केला जाणार आहे. यामुळे सॅटेलाईटला कार्यवाही करणे सुलभ ठरेल. तसेच मानवी हस्तक्षेप टाळता येईल, अशी माहिती नासाच्या वरिष्ठ संशोधक अधिकाऱ्यांनी दिली.