अॅपलला मागे टाकत सॅमसंग ठरला नंबर-१

अॅपलला मागे टाकत सॅमसंग ठरला नंबर-१

नवी दिल्ली - स्मार्टफोनचे युद्ध दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे. आयफोनच्या माध्यमातून अॅपलने जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल स्थान काबीज केले होते. मात्र स्मार्टफोनच्या जगात अधिराज्य गाजवणाऱ्या अॅपलला आता सॅमसंगने तगडा झटका दिला आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित अॅपलला मागे टाकत सॅमसंग नंबर-१ वर आहे.

सध्या सॅमसंगचा ग्लोबल स्मार्टफोन बाजारपेठेतील हिस्सा २२.३ टक्के इतका हिस्सा आहे. या तुलनेत अॅपलचा हिस्सा केवळ ११.९ टक्के आहे. अॅपलनंतर हुवाईचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा ९.५ टक्के आहे. गार्टनर या संशोधन संस्थेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. सॅमसंगने अॅपल सारख्या बलाढ्य कंपनीला मागे टाकल्याने स्मार्टफोन वॉर आता आणखी चुरशीचे होणार आहे.