आता घरी वीजनिर्मिती करणे होणार शक्य !

आता घरी वीजनिर्मिती करणे होणार शक्य !

नवी दिल्ली: घराच्या छतावर सोलर पॅनल लावून विजेची किलोवॅटमध्ये निर्मिती करणं आता सामान्य माणसांच्या आवाक्यात येणार आहे.त्यामुळे आता घरच्या घरी वीजनिर्मिती करणे शक्य होणार असून,ह्यासाठी ६०००० रुपये मोजावे लागणार आहेत आणि जर ह्यात सरकारी अनुदान मिळाले तर ३०% खर्च कमी होऊ शकतो.

 एक किलोवॅट वीज म्हणजे 1400 यूनिट विजेच्या बरोबरीची आहे. सोलर पॅनल सिस्टम 25 वर्षे टिकते त्यामुळे सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती नक्कीच फायदेशीर ठरेल. सोलर पॅनल बसवायचे असल्यास उघड्यावर (जिथे थेट सूर्यप्रकाश येईल तिथे) किमान 120 स्केअर फूट एवढी हवी. 

ग्रीनपीस इंडियाचे कॅम्पेनर पुजारीनी सेन यांनी सोलर पॅनलचा खर्च कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “सोलर पॅनल आर्थिकदृष्ट्या सोईचं झाल्याने प्रदुषणावर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. 2022 सालापर्यंत 100GW सौरउर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट भारताचं आहे.”