मोटो एक्स-४ लॉन्च

मोटो एक्स-४ लॉन्च

मोटोरोलानो आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटो एक्स-४ लॉन्च केला. याच्या ३+३२ जीबी वेरिएंटची किंमत २०,९९९ तर ४+६४ जीबी वेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे.स्टर्लिंग ब्ल्यू व सुपर ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. एडव्हान्स कॅमेरा सॉफ्टवेअर असलेला १२ एमपी ड्युएल व ८ एमपी रेअर कॅमेरा हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे.  या फोनमध्ये फोटो काढताना बॅकग्राउंड बदलवणेदेखील शक्य होणार आहे.याच्या ऑक्टाकोअर क्वॉलकॉम, स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसरमुळे लाईव्ह स्ट्रिमिंग किंवा गेम खेळणे सहज शक्य होणार आहे. केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगच्या बळावर याची बॅटरी सहा तास चालू शकेल असा कंपनीचा दावा आहे.