मायक्रोमॅक्सचा ‘भारत-५’ हा स्वस्त दरातील स्मार्टफोन लॉन्च

मायक्रोमॅक्सचा ‘भारत-५’ हा स्वस्त दरातील स्मार्टफोन लॉन्च

स्वस्त दराच्या मोबाईल फोन सिरीजचा विस्तार करत मायक्रोमॅक्स इन्फोर्मेटिक्सने शुक्रवारी भारत-५ हा ५,५५५ रुपये किंमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला. कंपनीने एका निवेदनात सांगितले, की या डिव्हाईसमध्ये ५,००० एमएएचची बॅटरी आहे. याचा स्टँडर्ड टाईम तीन आठवडे व रन टाईम दोन दिवसांचा आहे. यामध्ये फ्लॅशसह पाच मेगापिक्सेलचा फ्रंट व बॅक कॅमेरा आहे. मायक्रोमॅक्स इन्फोर्मेटिक्सचे मुख्य विपणन अधिकारी व मुख्य वाणिज्य अधिकारी शुभोदीप पॉल यांनी सांगितले, 'भारत सिरीजसह मायक्रोमॅक्स भारतीय ग्राहकांना डिजिटल स्वरूपात जुळण्यास मदत करून त्यांचा अनुभव अधिक सुलभ व सुखद बनवते. विजेची टंचाई असणाऱ्या टियर ३ व टियर ४ शहरांना लक्षात घेऊन हे उपकरण बनवण्यात आले आहे. यामध्ये ५.२ इंच एचडी आयपीएस डिस्प्ले, अँड्रॉईड नूगा ऑपरेटिंग सिस्टिम, १.३ गीगाहर्ट्झ क्वॉडोअर प्रोसेसर, १ जीबी रॅम, १६ जीबी ऑनबोर्ड व ६४ जीबी एक्स्पांडेबल मेमरी आहे.  मायक्रोमॅक्सने वोडाफोनशी भागीदारी करत भारत-५ खरेदी करणाऱ्यांना ५० जीबी डेटा मोफत उपलब्ध करून दिला आहे.