‘एम पासपोर्ट’ : पुणे, ठाणे नंतर आता नाशिकमध्येही ऑनलाइन पोलीस पडताळणी सेवा

‘एम पासपोर्ट’ : पुणे, ठाणे नंतर आता नाशिकमध्येही ऑनलाइन पोलीस पडताळणी सेवा

नाशिक : नाशिकने डिजिटल इंडिया या योजने अंतर्गत अजून एक सेवा अंगिकारली असून काल(ता.११) पासून नाशिक पोलीस आयुक्तालयाने ‘एम पासपोर्ट’ हि ऑनलाइन पारपत्र सेवा शहरवासीयांसाठी सुरु केली आहे. हि सेवा या आधी पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये राबविली जात होती. मात्र या सेवेत नाशिक शहराचा तिसरा क्रमांक लागला आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

या एम पासपोर्ट प्रणालीमध्ये नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना टॅबलेट फोनचे वितरण करण्यात आले असून त्यात इंस्टॉल असलेल्या ‘एम पासपोर्ट ’ या अॅपद्वारे अर्जदाराच्या घरी जाऊन प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची कॉपी स्कॅन करून पुढे आयुक्तलयात पाठवायची आहे. यारून अर्जादारचा पत्ता बरोबर असल्याची खात्री लगेचच होणार आहे.

या कार्यप्रणाली बाबत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या उद्घाटन आणि प्रशिक्षण वेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विजय मगर, परिमंडळ एकचे उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपायुक्त मधुरी कांगणे, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पासपोर्टचे काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.