जिओची ग्राहकांसाठी तिप्पट कॅशबॅग ऑफर

जिओची ग्राहकांसाठी तिप्पट कॅशबॅग ऑफर

रिलायन्स जिओने आपल्या प्राइम ग्राहकांसाठी २५९९ रुपयांपर्यतची आकर्षक कॅशबॅक ऑफर दिली आहे. हे प्राइम ग्राहक काही निवडक ठिकाणी खरेदी करताना या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. आपल्या ग्राहकांना टिकवणे या उद्देशाने रिलायन्स जिओने ही ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या नव्या ऑफरसाठी कंपनीने अॅमेझॉन पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या कंपन्यांशी करार केले आहेत. या नव्या ऑफरअंतर्गत ग्राहकांना कंपनीकडून ३९९ रुपये आणि त्याहून अधिकच्या प्रत्येक रिचार्जवर ४०० रुपये मूल्याचे जिओ व्हाउचर मिळणार आहे. शिवाय जिओचे पार्टनर्स प्रत्येक रिचार्जवर ३०० रुपयांचे तत्काळ कॅशबॅक देणार आहेत. याबरोबरच ajio.com वर १५०० रुपयांच्या किमान खरेदीवर जिओच्या प्राइम ग्राहकांना ३९९ रुपयांची सूट दिली जाणार आहे. तर, yatra.comवर विमानाच्या तिकीट खरेदीतही १००० रुपयांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. reliancetrends वर १९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूटही कंपनीच्या प्राइम ग्राहकांना मिळणार आहे.