गुगलचे व्हॉईस असिस्टंट आता जिओ फोनवर उपलब्ध

गुगलचे व्हॉईस असिस्टंट आता जिओ फोनवर उपलब्ध

देशातील फिचर फोन वापरकर्त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी गुगलने आपले व्हॉईस असिस्टंट रिलायन्स जिओ फोनवर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा गुरूवारी केली. कंपनीने सांगितले, की जिओ फोनसाठी गुगल असिस्टंट इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.गुगल व्हॉईस असिस्टंट अॅप्स व डिव्हाईसला चालना देणे, प्रश्नांची उत्तरे देणे, योजना आखणे व अशा प्रकारची अनेक उपयोगी कामे करण्याचे काम करते. व्हॉईस असिस्टंट फिचर फोनमध्ये उपलब्ध होण्याची ही पहिली वेळ असेल. फोरजी व व्हीओलाईट क्षमता असलेला जिओ फोन २१ जुलैला लॉन्च करण्यात आला. १५०० रूपये जमा केल्यावर हा फोन मोफत उपलब्ध होतो. ५० हजार ग्राहकांपर्यंत हा फोन पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या फोनमध्ये दोन मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा व २ हजार एमएएच बॅटरी आहे. जिओ फोनमध्ये सिंगल नॅनो सिम स्लॉट आहे. तसेच यामध्ये एक मायक्रो एसडी कार्ड स्लॉटदेखील दिलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिओवर दररोज १०० जीबीपेक्षा जास्त डेटाचे आदान-प्रदान केले जाते.