जगातला पहिला फिजेट स्पिनर फोन भारतात

जगातला पहिला फिजेट स्पिनर फोन भारतात

मुंबई - फिजेट स्पिनर या खेळण्याने कमी वेळात जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. या खेळण्यापाठोपाठ आता फिजेट स्पिनर मोबाईलची चर्चाही जोरात सुरू झाली आहे. चिली इंटरनॅशनल होल्डिंग (एचके) लिमिटेडने जगातील पहिला फिजेट स्पिनर मोबाईल भारतामध्ये आणला आहे. याची किंमत फक्त १२०० रुपये असणार आहे. K188, F05 आणि एजीपीएस असलेले फोन दाखल झाले आहेत. या फिचर फोनमध्ये गाणी ऐकणे, व्हीडीओ पाहणे, रेकॉर्डींग करण्याची सुविधा आहे. शिवाय हा फोन स्पिनरप्रमाणे फिरवून ताणतणाव कमी करण्याची सुविधाही आहे. अॅमेझॉनपासून ते शॉपक्लूजपर्यंत सर्व ऑनलाईन स्टोअर्समध्ये तसेच रिटेलरकडेही ते उपलब्ध आहेत. सहा आकर्षक रंगात हे फोन उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्याला एजीपीएस टेक्नॉलॉजी दिली गेल्याने लोकेशन ट्रॅकींग करण्याची सुविधा आहे तसेच ड्युअल सिम, ३.१ सेंमीचा स्क्रिन, ३२ एमबी रॅम, ३२ एमबी स्टोरेज ते मायक्रोकार्डच्या सहाय्याने ८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १.३ एमपीचा कॅमेरा अशी फिचर्सही आहेत. ब्ल्यू टूथ डायल म्हणजे स्क्रीनला टच न करता कॉल करण्याची सुविधाही यात आहे.