फेसबुक घेत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत दहशतवादाशी लढण्यासाठी

फेसबुक घेत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत दहशतवादाशी लढण्यासाठी

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) व मशीन लर्निंगचा वापर करून दहशतवादाला प्रोत्साहन देणारी माहिती लोकांच्या निदर्शनास येण्यापूर्वीच मिटवण्यात फेसबुक सज्ज झाले आहे. इस्लामिक स्टेट्स (आयएस) व अलकायदा यांच्याद्वारे प्रसारित माहितीला समूळ नष्ट करण्याची यंत्रणा फेसबुकने विकसित केली आहे. फेसबुकचे वैश्विक धोरण प्रबंधन प्रमुख मोनिका बिकर्टने एका ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले, 'आज फेसबुकवरून अनेक आयएस व अलकायदाशी निगडीत दहशतवादाला प्रोत्साहन देणारी माहिती इतरांना दिसण्यापूर्वीच काढून टाकण्यात आम्ही समर्थ आहोत. अनेकदा वेबसाईटवर लाईव्ह होण्यापूर्वीच अशी माहिती काढून टाकण्यात येते.'   यासाठी स्वयंचलित प्रणालीचा वापर केला जातो. यामध्ये फोटो व व्हिडीओ जुळवून बघणे आणि टेक्स्ट आधारित मशीन लर्निंगचा समावेश आहे. फेसबुकचे दहशतवाद धोरण प्रमुख ब्रायन फिशमॅन यांनी सांगितले, 'दहशतवादाशी संबंधित कोणतीही माहिती आढळताच त्या माहितीशी संबंधित सर्व गोष्टी अपलोड झाल्यापासून एक तासाच्या आत आम्ही काढून टाकतो.'