रोबोटिक तंत्राद्वारे दुर्मिळ शस्त्रक्रिया

 रोबोटिक तंत्राद्वारे दुर्मिळ शस्त्रक्रिया

हाडांच्या चुकीच्या ठेवणीमुळे लांबीने कमी-जास्त झालेले पाय एकसारखे रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे करण्याचे दुर्मिळ ऑपरेशन वानवडी येथील इनामदार मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच यशस्वी झाले. इनामदार हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मुर्तझा अदिब, डॉ. आशिष रानडे यांच्या समवेत हे गुंतागुंतीचे ऑपरेशन करण्यात आले. 

'२२ वर्षाच्या अयात या वैद्यकीय शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या पायांच्या उंचीसंदर्भात समस्या होती. ती लंगडल्यासारखे चालत होती. तिच्या मणक्यामध्ये बाक निर्माण झाला होता. तिच्या उजव्या गुडघ्यात व्यंग होते. अकराव्या वर्षी तिच्यावर पहिले ऑपरेशन झाले; पण या ऑपरेशनमध्ये गुंतागुंतीमुळे विकृती निर्माण झाली. अखेर, इनामदार हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ऑपरेशन करण्याचे ठरविण्यात आले,' अशी माहिती अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मुर्तझा अदीब यांनी दिली. रोबोटिक सर्जरी तसेच अस्थिरोग विज्ञानाच्या माध्यमातून ऑपरेशननंतर सहा महिन्याने पायाची लांबी एकसारखी झाली.