ऑनलाईन डेटिंग पासून सावध

ऑनलाईन डेटिंग पासून सावध

स्मार्टफोन वापरणा-यांपैकी जवळ जवळ ५९% युजर्स ऑनलाईन अॅप वापरतात. त्यांच्यापैकी बरेचजण संकटात सापडू शकतात कारण तुम्ही दिलेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्व्हेमधून ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.भारतात डेटिंग बेस्ड सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर वेगाने वाढत आहे. अनेकजण काही मर्यादित काळासाठी असे अॅप वापरुन अनइन्स्टॉल करतात. सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेतात आणि यूझर्सचा इंटरेस्ट पाहून ऑफर देतात आणि ह्या ऑफर्सचा वापर करून अनेकजणांना लुबाडल जात. काहीजणांच्या क्रेडीट कार्डमधून पैसे कट झालेयत तर काही जणांना युज करताना अचानक पोर्नसाईट उघडण्याच्या अनुभवला समोर जाव लागल आहे. 

सिक्युरिटी फर्मच्या सल्ल्यानुसार, अशा कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका, जी तुमच्या जुन्या काँटॅक्टच्या माध्यमातून आली असेल. कारण सायबर क्रिमिनल्स अशा काँटॅक्टचा गैरवापर करत असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यास पॉर्न वेबसाईट किंवा वेबकॅम साईट उघडतात.

अनेकदा अशाही लिंक ऑनलाईन डेटिंग अॅपवर येतात, ज्यावर क्लिक केल्यास व्हायरसचा धोका निर्माण होतो. बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्सची चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ज्यावेळी ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरत असाल, त्यावेळी व्हेरिफाईड कंपनीचं अॅप आहे की नाही, हे तपासून पाहिलं पाहिजे