सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस क्षेपणास्राची यशस्वी चाचणी संपन्न

सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस क्षेपणास्राची यशस्वी चाचणी संपन्न

भारत व रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चंदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावर शनिवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस असून, त्याची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंतचे लक्ष अचूकपणे टिपू शकते. ‘संरक्षण संशोधन विकास संस्थेचे (डीआरडीओ) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या ब्राह्मोस क्षेपणास्रामध्ये अचूक लक्ष भेदण्याची क्षमता आहे.

नवीन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले हे क्षेपणास्र संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हीं दलांची शक्ती वाढणार आहे. सर्वात अचूक लक्ष्यभेदी क्षमता असणारे हे जगातील पहिले क्षेपणास्र असल्याचा दावाही मिश्रा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ह्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला.‘डिआरडीओ’चे प्रमुख ख्रिस्तोफर या क्षेपणास्राविषयी म्हणाले की, भारत-रशियाच्या संगनमतानेच ब्राह्मोसची मारक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्षेपणास्रामध्ये ४५० किमी पल्ला भेदण्याची क्षमता असल्यामुळे फक्त पाकिस्तानच नव्हे तर चीनचेही धाबे दणाणले आहेत.  आता ह्यामुळे पाकिस्तान आणि चीन कोणते नवे पाउल उचलणार हे पाहणे गरजेचे आहे.