300 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन

300 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन

एअरटेलनं आपल्या यूजर्ससाठी तब्बल 300 जीबी 4जी डेटा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 360 दिवसांसाठी वैध असणारआहे. यासोबतच दररोज 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये मिळणार आहे. या प्लॅनची किंमत 3,999 रुपये असून हा प्लॅन जवळजवळ वर्षभरासाठी असणार आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यूजर दिवसाला किती डेटा वापरु शकतो. म्हणजेच दिवसाला कोणतीही डेटा मर्यादा यूजर्सला नाही. इतकंच नव्हे तर एअरटेलनं 1,999 रुपयांच्या प्लॅन देखील लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला 180 दिवसांसाठी 125 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्येही दररोज वापरासाठी डेटा लिमिट नाही. दरम्यान, नुकतंच एअरटेलनं 349 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सला 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.