दिव्या काकराननं जिंकलं कांस्य पदक

 दिव्या काकराननं जिंकलं कांस्य पदक

भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरान हिनं ६८ किलो वजनी गटातील फ्री स्टाइलमध्ये दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. दिव्यानं कांस्य पदकासाठी झालेल्या मुकाबल्यात चीनची कुस्तीपटू चेन वेनलिंग हिचा १०-०ने पराभव केला. 

दिव्याला ६८ किलो वजनी गटात फ्री स्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाची कुस्तीपटू शारखू तुमेंतसेत्सेगकडून १-११ अशी हार पत्करावी लागली होती. शारखूनं उपांत्यफेरीत चेन वेनलिंगवर १०-०ने मात करत अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली. शारखू अंतिम फेरीत पोहोचल्यामुळं दिव्याला संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत तिनं देशासाठी पदकाची कमाई केली.