मिचेल जॉन्सनचा जिममध्ये अपघात, डोक्याला पडले १६ टाके

मिचेल जॉन्सनचा जिममध्ये अपघात, डोक्याला पडले १६ टाके

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनचा जिममध्ये व्यायाम करताना अपघात झाला. व्यायाम करताना बार डोक्याला लागल्याने त्याला १६ टाके पडले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. आपल्या बरोबर झालेल्या या अपघाताचे फोटो या ३६ वर्षीय गोलंदाजाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अतिशय खोलवर झालेल्या जखमेचे मिचेल ने फोटो शेअर केले आहेत. “तुम्हाला जर जखमा आणि रक्त सांडलेले आवडत नसेल तर हे फोटो पाहू नका. माझ्याबरोबर झालेली ही अतिशय वाईट गोष्ट आहे. परंतू मी आता ठीक आहे. ” असे जॉन्सनने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.