IND vs SA : रोहित शर्माचे दमदार शतक , आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान

IND vs SA : रोहित शर्माचे दमदार शतक , आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान

पोर्ट एलिझाबेथ - मालिकेत सतत अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा दमदार शतक ठोकुन ११५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्या भोपळाही न फोडता माघारी परतला तर श्रेयस अय्यरही ३० धावा करुन बाद झाला. भारताची धावसंख्या ४६.३ षटकात २५२/६ आहे. भुवनेश्वर कुमार (९ चेंडू ८ धावा), महेंद्रसिंग धोनी (१२ चेंडू ६ धावा) खेळत आहेत. आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय मालिकेत पाचव्या सामन्यात भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन ३४ धावा काढून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. भारताने दीडशे धावा पूर्ण केल्यानंतर, विराट कोहली ३६ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आलेला अजिंक्य चोरटी धाव घेण्याच्या नादात  स्वस्तात माघारी परतला.

पाचव्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर भारत प्रथमच दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास रचणार आहे.जोहान्सबर्मध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या चौथ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले. तसेच धडाकेबाज फलंदाज एबी डी व्हिलिअर्सही गेल्या सामन्यात संघात परतला आहे. यामुळे द. आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. पहिल्या तीन सामन्यातील विजयामध्ये भारताच्या फिरकी गोलंदाजांचा मोठा वाटा होता. मात्र जोहान्सबर्गमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांची लय बिघडली. भारतीय फिरकीपटूंचा आफ्रिकी फलंदाजांनी नेटाने सामना केला. यामुळे यजमानांनी भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्याचे तंत्र अवगत केल्याचे सिद्ध होत आहे.