आशिया कप हॉकी : भारताची जपानवर ५-१ ने मात

आशिया कप हॉकी : भारताची जपानवर ५-१ ने मात

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. सलामीच्या सामन्यात भारताने जपानवर ५-१ ने विजय मिळवला. संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. सामन्याच्या तिसऱ्या मिनीटाला एस. व्ही. सुनीलने गोल झळकावत भारतीय संघाचे खाते उघडले. मात्र यानंतर लगेच जपानच्या केनजी किटाझाटोने गोल करत बरोबरी केली. ललित उपाध्यायने २२ व्या मिनिटाला गोल झळकावत भारताला आघाडी मिळवून दिली. तर रमणदीप सिंहने ३३ व्या मिनिटाला भारताकडून आणखी एक गोल झळकावला. यानंतर हरमनप्रीत सिंहने ३५ आणि ४८ व्या मिनिटाला गोल झळकावले. यानंतर जपानच्या संघाला सामन्यामध्ये कमबॅक करता आला नाही.