साडेतीन कोटी बक्षिसाची घोषणा म्हणजे निव्वळ दिखावा : साक्षी मलिक

साडेतीन कोटी बक्षिसाची घोषणा म्हणजे निव्वळ दिखावा : साक्षी मलिक

रिओ ऑलम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिकने हरयाणा सर्क्वर सडकून टीका केली आहे. तिला बक्षीस म्हणून जाहीर केलेली साडे तीन कोटी रुपयाची रक्कम अद्याप तिला मिळाली नसल्याचे तिने सांगितले आहे. बक्शिसाबाब्टची टीका तिने ट्वीटरच्या माध्यामतून केली आहे.

मी माझे पदक आणण्याचे वचन पूर्ण केले परंतु सरकारने त्यांचे वचन पूर्ण केले नाही असे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे. सुवर्णपदक जिंकणाऱ्या व्यक्तीस ६ कोटी, रजत पदक जिंकणाऱ्यास ४ कोटी आणि कांस्य पदक जिंकणाऱ्यास २.५ कोटी रुपये देऊ असे वचन दिले होते. माध्यमांसमोर आपला बोलबाला व्हावा याकरता हरियाणा सरकारने या घोषणा केल्या होत्या असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या या पोस्टमध्ये तिने क्रीडा मंत्री विजय गोयल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खत्तर आणि अनिल वीज यांना टॅग केले आहे.

ह्याउलट हरयाणा सरकारने आपण केवळ अडीच कोटीची रक्कमच बक्षीस म्हणून जाहीर केली होती असे म्हंटले आहे. देशात आधीच क्रीडाक्षेत्राला आधीच हवा तसा मान मिळणे दुरापास्त असताना सरकारकडून अपेक्षित कौतुक न होणे हि दुखद बाब आहे.