भारतीय रेसर अश्विन सुंदरचा अपघाती मृत्यू

भारतीय रेसर अश्विन सुंदरचा अपघाती मृत्यू

चेन्नई: भारतीय प्रोफेशनल कार रेसर अश्विन सुंदरचा त्याची पत्नी निवेदितासह कार अपघातात काल शनिवारी मृत्यू झाला. शनिवारी पाहते हि घटना घडली.

चेन्नईतील सँथम रोडवर अश्विन सुंदर यांची बीएमडब्ल्यू कार एका झाडाला जाऊन आदळली. झाडाच्या आणि एका भिंतीच्या मध्ये अडकलेल्या कारने अचानक पेट घेतला. मात्र दरवाजे बंद झाल्याने दोघांनाही बाहेर पडता आलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह गाडीतून बाहेर काढले.

ह्या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.