नाशिक सायकलिस्टस :  ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन

नाशिक सायकलिस्टस :  ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे सालाबाद ‘नवरात्र सायकल वारी’ दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विविध शक्तीपीठांना भेट देण्यात येणार आहे. २१ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोस्तवाची तयारी सर्वच स्तरावर जोरदार सुरु आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेच्या मंदिरासह शहारातील विविध देवी मंदिरात मंडप टाकले जात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध शक्तीपीठांमध्येहि जय्यत तयारी सुरु आहे. नाशिक सायकलिस्टस तर्फेही भगूर,कोमटगाव, वणी, चांदवड या ठिकाणी सायकलवर जात देवींचे दर्शन घेतले जाणार आहे.

नवरात्र सायकल वारी दरम्यान २२ सप्टेंबर रोजी पहिली वारी भगूर येथील रेणुका देवी मंदिरांपर्यंत करण्यत येणार आहे. २३ सप्टेंबरला वणी येथील श्री सप्तशृंगी देवी संस्थान, २४ सप्टेंबर कोमटगाव येथील श्री क्षेत्र जगदंबा संस्थान, तर २६ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक श्रीक्षेत्र चांदवड रेणुका देवी संस्थान येथे भेट देण्यात येईल.वरील वारींची जबाबदारी अनुक्रमे डॉ. मनीषा रौंदळ, मोहन देसाई, डॉ. आबा पाटील, नाना फड यांच्याकडे देण्यात आली आहे.