‘भारतीय वंशाच्या नागरिकांवर होणारे हल्ले निंदनीय’

‘भारतीय वंशाच्या नागरिकांवर होणारे हल्ले निंदनीय’

भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध केलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असे अमेरिकेचे डेमोक्रेटिक नेते जिम कोस्टा यांनी म्हटले आहे .भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध हिंसाचार अजिबात सहन केला जाणार नाही असे त्यांनी म्हटले.  आपला देश धार्मिक स्वातंत्र्य या आधारावर निर्माण झाला आहे. याचा विसर आपल्याला पडता कामा नये ,असे त्यांनी म्हटले. भारतीयांवर झालेले अत्याचार हे  अतिशय निंदनीय आहेत, त्याची मुळे धार्मिक द्वेष आणि वांशिक द्वेषातून आलेली आहेत असे ते म्हणाले. नुकताच अमेरिकेमध्ये वर्णद्वेषातून भारतीयांवर हल्ले केल्याच्या सलग दोन घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

 या घटनांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील निषेध केला आहे. धर्म आणि वंशाच्या आधारे होणाऱ्या भेदभावाला या देशात स्थान नाही असे त्यांनी म्हटले. धर्म आणि वंशाच्या मुद्दावरुन होणाऱ्या हिंसा थांबाव्यात यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलत आहेत. अमेरिकेच्या स्थापनेपासून येथे नागरिकांच्या स्वातंत्र्याची जपणूक केली जाते असे ते म्हणाले. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.  मूलभूत हक्कांचे संवर्धन व्हावे या समर्पित भावनेने आपण काम करत आहोत असे ते म्हणाले.