विक्रोळीमधील एसआरए बांधकामाच्या ठिकाणचा खडा बनला धोकादायक

विक्रोळीमधील एसआरए बांधकामाच्या ठिकाणचा खडा बनला धोकादायक

 विक्रोळीत टागोरनगर मधील लोकवस्तीच्या ठिकाणी
एसआरए प्रकल्पासाठी खणलेल्या १५ ते २० फुटाचा खडा धोकादायक असून यात
अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी साचले असून बाजूचे कुंपणही तुटले आहे.या
खड्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही प्रशासन अत्यंत
उदासीन आहे. याविषयीचा अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासन झोपलेलच आहे.
या दुर्गंधीत पाण्याने सगळीकडे रोगराईचे आणि डासांचे साम्राज्य निर्माण
झाले आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी अनेक लहान मुले,स्त्रिया आणि वृद्ध माणसे
असून मोठ्या प्रमाणात ताप,खोकला आणि इतर आजार बळावले आहेत. पालिकेकडून
याविषयी विचारणा केल्यावर संबंधित बिल्डरला पेस्ट कंट्रोल विभागाने नोटीस
पाठवल्याचे मुळमुळीत उत्तर दिले आहे.
याविषयी मुलुंडचे भाजप नगरसेवक निल सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी येथील खड्यतील पाणी काढण्याविषयी तयारी दर्शविली परंतु एस
वॉर्डमधील संबंधित विभागाने हा प्रश्न आता न्यायालयाच्या अधीन असल्याने
न्यायालयाच्या आदेशापर्यंत काहीही करू न शकत असल्याचे सांगितले. यामुळे
न्यायालयीन आदेशाची वाट बघण्याशिवाय कोणताच मार्ग दिसत नसल्याचे चित्र
स्पष्ट होत आहे.