भाविकांनी त्र्यंबकेश्वर गजबजले

भाविकांनी त्र्यंबकेश्वर गजबजले

त्र्यंबकेश्वर : सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी गर्दी उसळली आहे. उत्तर दरवाजाने प्रवश देण्यात येत असला तरी भाविकांची रांग थेट ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचत आहे. भर उन्हात भाविक रस्त्यावर उभे असल्यामुळे त्यांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. शनिवारी, रविवार आणि त्यानंतर गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी आल्यामुळे राज्यासह परराज्यातील भाविक पर्यटनाकडे वळाले आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर एकाच दिवसात दर्शन करून होत असल्यामुळे येथे भाविकांचा नेहमीच राबता असतो. गेल्या दोन दिवसांपासून गर्दी वाढली आहे. मात्र त्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करत भावि‌कांना बराच वेळी रांगत थांबावे लागत आहे.