स्वयं एज्युकेशन फाऊंडेशन

स्वयं एज्युकेशन फाऊंडेशन

भांडुपच्या स्वयं एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने जैनम सभागृहात रविवारी सायंकाळी ७ वाजता एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लहान मुले आणि महिलांना शिक्षणात हातभार लावून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतोय . 

यासाठी या संस्थेच्या माध्यमातून मुंबईच्या विविध भागात एज्युकेशन कॅम्प भरविण्यात येतात ज्यामध्ये 

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच परिस्थितीअभावी पुढचं शिक्षण घेऊ न शकलेल्या महिलांना दहावी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा ध्यास या संस्थेने घेतला आहे . या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलं आहे . शिक्षणासोबत सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता यावी या उद्देशाने स्वयं संस्थेच्या माध्यमातून आज या सर्वांना एक वैचारिक व्यासपीठ मिळवून देण्यात आला . कलेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे कलाप्रकार सादर करण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात आली . 

यासोबतच समाजात वावरताना नेमक्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणे घ्यावी यासंदर्भात भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे   यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं . या कार्यक्रमाला समाजसेविका पल्लवी पाटील,माजी खासदार संजय दिना पाटील ,उद्योजक व  व्यावसायिक विक्रम कामत व प्रशांत इस्सर आणि अनुप शहा यांनी उपस्थिती लावली . या व्यासपीठाच्या माध्यमातून  विद्यार्थी आणि महिलांना विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी तसेच त्यांना अनेक सामाजिक विषयांची जाण निर्माण होईल , त्यामुळे या महिला आणि विद्यार्थी समाजाच्या मूळ प्रवाहात सामील होतील अशी अपेक्षा स्वयं एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा देसाई यांनी व्यक्त केली