सुभाष देसाईंनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

सुभाष देसाईंनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. त्यानंतर देसाई यांनी राजीनामा द्यावा याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपविला. पण मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा राजीनामा फेटाळला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसी ची ४०० एकर जमीन मूळमालकाला परत केल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता.