ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष, भारतीय अथलेटीक महासंघाचे सहसचिव , ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत (६९) ह्रदय विकाराच्या झटक्याने गुरूवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्यामागे बहीण विजया मोरे, भाचा रोहन मोरे, पुतणी गौरी सावंत आणि दिव्या सावंत असा परिवार आहे. 

सावंत यांना दुपारी पत्रकार नगर येथे राहत्या घरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर लगेच त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले . संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सावंत यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हे वृत्त समजताच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी केली होती.