पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकर पोहोचले राणीच्या बागेत

पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकर पोहोचले राणीच्या बागेत

मुंबई: मुंबईतल्या राणीच्या बागेत गेल्या वर्षभरापासून नवीन पाहुण्यांचं आगमन झाल आहे आणि आता मुंबईकरांना ह्या पाहुण्यांना भेटताही येणार आहे. नुकतच राणीच्या बागेतल्या पेंग्विन कक्षाच उद्घाटन पार पडल आणि आता त्यांना भेटण्यासाठी मुंबईकरांनी राणीच्या बागेत गर्दी सुरु केली आहे.

31 मार्चपर्यंत पेंग्विन पाहण्यासाठी कुठलीची फी घेतली जाणार नाही. त्यामुळं सध्या लोक सहपरिवार पेंग्विन पाहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. भर उन्हातही पेंग्विन पाहण्याचा मुंबईकरांचा उत्साह कमी झालेला दिसत नाहीये. परंतु पेंग्विन वर येणाऱ्या खर्चामुळे कदाचित १ एप्रिलपासून ही फी १०० रुपयापर्यंत जाऊ शकते.

या शुल्कवाढीबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.