पंचवटी एक्सप्रेस होणार आदर्श

पंचवटी एक्सप्रेस होणार आदर्श

नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोमवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून पंचवटी एक्सप्रेसला आदर्श ट्रेन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर रेल परिषद, रोटरी क्लब वेस्ट, पतंजली- भारत स्वाभिमान न्यास, आदर्श विद्या मंदिर, आशा फाउंडेशन व विद्यार्थ्यांनी रेल्वेस्टेशन परिसराची स्वच्छताकेली.

खासदार हेमंत गोडसे, आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, उपाध्यक्ष व्ही. जे. आर्य, कैलास कमोद, दिग्विजय कपाडीया, रोटरीचे गुरुमितसिंग रावल, दीपक शर्मा, स्थानकप्रमुख एम. बी. सक्सेना यांच्याहस्ते पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.